Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

*दिवाळीत एस.टी.ची 25 ऑक्टोबर चे 24 नोव्हेंबर पर्यंत 10 टक्के हंगामी भाडेवाढ*


 

*विशेष.-----प्रतिनिधी*

*राजु. ...मुलाणी*

*टाइम्स 45  न्यूज मराठी*

 *मो:-8408 817 333*

दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ असणार आहे. वा भाडेवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीत सुमारे ९५० ते एक हजार कोटीचा महसूल जमा होईल. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास ७० ते १००० रुपयांनी महागणार आहे.


दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आमजतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्टघांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते, महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते, महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ स्वस्पाची भाडेवाढ केली जाते.



यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाणार आहे. सध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता ही भाडेवाढ लागू असणार आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू असणार नाही. १० टक्के भाडेवाढीमुळे राज्यातील जनतेचा दिवाळी सणाच्या दिवसातील एसटीचा प्रवास महागणार आहे.


सध्या दिवसाला सुमारे २३ ते २४ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र ३० कोटी रुपये होईल, त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला ९५० ते १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल. सध्या महिन्याला ८५० कोटी रुपये महामंडळाला उत्पन्न मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा