Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

*पक्षप्रमुख "उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ! 'चंद्रकांत खैरे 'यांचे आई तुळजाभवानी मातेला साकडे*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

तुळजापूर - येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला आज दि.७ ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली असून यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भवानी मातेचे दर्शन घेऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे असे साकडे घातले.

चंद्रकांत खैरे यांनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा ही नवरात्र काळात आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.  महाराष्ट्रातील बळीराजा सुखी समृद्धी व्हावा यासाठी आरती करून भवानी मातेला साकडे घातले. याप्रसंगी धाराशिव जिल्हा महिला आघाडी प्रमुख शामल वडणे पवार,शहरप्रमुख सुधीर कदम,माजी जिल्हा उपप्रमुख शाम पवार आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा