Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

*गुजरात मध्ये "सरदार वल्लभभाई पटेल "यांचे स्मारक होऊ शकते !तर मग आरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा का नाही ?--'संभाजी राजे'- यांचा आक्रमक सवाल?*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

*"चला शिवस्मारक शोधायला"*अशा घोषणा देत पुण्याहून निघालेल्या संभाजी राजे छत्रपतींच्या रॅलीला मुंबई पोलिसांनी अडवलं. यावेळी संभाजीराजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. संभाजीराजे अरबी समुद्राकडे जाण्यावर ठाम आहेत. तर संभाजीराजे छत्रपतींनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.तर 5 हजार तिकीट काढले आणि दुर्बिणीतून पाहू आणि स्मारकाचं अभिवादन करू असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय.शिवस्मारक पाहण्यासाठी आम्ही येथे आल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.


परवानग्या घेऊन काम कुठे अडलं?


माझं हे आंदोलन नाहीये तुम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणाल तर चालेल. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत छत्रपती शिवरायांचे स्मारक व्हावे ही पहिली मागणी शाहू महाराज यांनी केली. सगळा खर्च मी करतो असं त्यांनी मुंबई महापालिकेला संगितलं होतं. यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं. अशोक चव्हाण यांनी सांगितलं. भाजपने जाहीरनाम्यात सांगितलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपुजन केलं पण सगळ्या परवानग्या घेऊन काम कुठे अडलं? असा प्रश्न त्यांनी विचारला. 


..मग अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक का नाही?


गुजरातमध्ये सरदार वल्लभाई पटेल यांचे स्मारक उभे राहू शकते. पण अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाहीय. मी या गोष्टीचा वेळोवेळी पाठपुरावा केला. यात पर्यावरणचे अडचण झाली आहे. यासंदर्भात कोर्टात विषय झाला आहे. सरकारला प्रश्न पडला आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे. समिती स्थापन केली आहे. एल अँड टीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. मग पुढे काय झालं? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला. 


हे काही राजकीय भाषण नाही. त्या घरात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे यासंबधी प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे. डिजिटल बोर्ड लावले ते फाडून टाकले आणि पक्षाचे डिजिटल बोर्ड लागले. फोटोवाल्यांना फोन केला स्वराज्याचे कार्यकर्ते आले तर तुमचा परवाना रद्द  अशी धमकी दिली. ही कसली दडपशाही? असे ते म्हणाले. 


'छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे खोटं चालणार नाही'


आम्ही 5000 तिकीट काढली आहेत. समुद्रावर दुर्बिण घेऊन जाऊ. पोलिसांच्या म्हणणं ऐकून घेऊ, असे छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलंय. आम्ही खाकीचा आदर करतो. कोणताच कायदा मोडला नाही. तुम्ही चुकीचे आहात, असं सरकारने सांगाव. मी परत जायला तयार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे खोटं चालणार नाही, असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा