Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

*"कर्मयोगी आबासाहेब देशमुख" यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे सलग ११ टर्म सांगोल्याचे आमदार बनलेले व विधानसभेकडे एसटी प्रवास करत आगेकुच करणारे दिवंगत गणपतराव तथा आबासाहेब देशमुख यांच्या जीवनचरित्रावर आधारित येत्या २५ ऑक्टोबरला चित्रपट येत आहे. कर्मयोगी आबासाहेब हे चित्रपटाचे नाव असून लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दादासाहेब जाधवराव यांना कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाचे पोस्टर फ्रेम भेट दिली. या पोस्टर फ्रेम देताना दिग्दर्शक, लेखक अल्ताफ दादासाहेब शेख आणि सत्यशोधक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष विशाल धेंडे उपस्थित होते. येत्या २५ ऑक्टोबर २०२४ रोजी हा

"आबा साहेब"

चित्रपट संपूर्ण जगभरात हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होत असून प्रदर्शनापूर्वीच कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. वर्ल्ड बुक रेकॉर्डला नोंद झाल्यामुळे हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत जाण्यासाठी सुद्धा तयार आहे. तसेच कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल


मध्ये देखील निवड झाली आहे. मायाक्का माऊली फिल्म निर्मित बाळासाहेब एरंडे मारुती आबा बनकर यांचे मोठे सहकार्य लाभले परदेशात कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले आहे. रसिक श्रोते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. असे सुद्धा लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा