*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----------
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते इरफान महेबुब शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पदी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे, आमदार यशवंत तात्या माने यांचे सहकार्य लाभले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतीन कांमले, शिवकुमार चलवादी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवत माझी प्रदेश सचिवपदी निवड केली त्यास पात्र राहुन पक्ष वाढीसाठी तसेच जास्तीत जास्त आमदार विजयी कसे होतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया इरफान महेबूब शेख यांनी निवडी प्रसंगी व्यक्त केली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा