*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार. लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस येथे अक्षता मंगल कार्यालयात समाजसेविका व पत्रकार सौ शोभा वाघमोडे व पत्रकार तानाजी एकनाथ वाघमोडे रा.६० फाटा माळशिरस यांची सुकन्या तृप्ती हिचा विवाह कांतीलाल भिकू कोळेकर रा.चौगुले वस्ती माळशिरस यांचे चिरंजीव विकास यांच्या शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या शुभविवाह प्रसंगी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना पुढील वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी दैनिक पंढरी संचारचे संपादक बाळासाहेब बडवे,माळशिरस नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख,विद्यमान नगराध्यक्ष पैलवान विजयकुमार देशमुख,श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मिलिंद कुलकर्णी,श्री श्री सदगुरू साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर,माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे,मनसेचे नेते सुरेश टेळे,माजी उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख,धनाजी ठवरे,गोरख जानकर,बाळासाहेब सरगर माळशिरस तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक,सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठवणाऱ्या शोभा वाघमोडे यांची कन्याच्या लग्नासाठी पंजाब वरून आलेले मेजर विक्रम राजाराम नाईकनवरे आवर्जून उपस्थित राहुन वधू वरांना शुभेच्छा दिल्या.तसेच सीमेवरील लाखो जवानांनी या वधू-वरांना भ्रमध्वनीवरून मेसेज करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.मळशिरस तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी,डॉक्टर्स,मेडिकल, इंजिनीयर,ग्राहक पंचायत सदस्य, सर्व प्राध्यापक,मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ,सर्व शेतकरी बांधव, व्यापारी बंधू माळशिरस व पंचक्रोशीतील सर्व पाहुणे, मित्रमंडळी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* *जाहिरात*







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा