*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ज्येष्ठ इतिहास संशोधिका डॉ.सौ लता अकलूजकर यांच्या वराह श्री विष्णूचा तिसरा अवतार आणि वीरगळ एक अभ्यास या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन सोहळा नुकताच मंगल भैरव क्लब हाऊस नांदेड सिटी पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोलापुरातील ज्येष्ठ बांधकाम व्यवसायिक किशोरजी चंडक यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले . यावेळी अँड.नरसिंह लगड, श्रीराम बेंद्रे तसेच मर्वेन टेक्नॉलॉजीचे मनोज केळकर उपस्थित होते
उपस्थितांचे व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत कु.ऋता कुलकर्णी यांनी केले.किशोर चंडक यांनी दोन्ही ग्रंथ फार वेगळ्या विषयावर आहेत असे स्पष्ट केले तसेच विष्णूंच्या इतरही अवतारावर लेखिकेने लिखाण करावे असाही आग्रह त्यांनी केला.प्रमोद अकलूजकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून सत्कार केला. ज्येष्ठ इतिहास संशोधिका डॉ.लता अकलूजकर यांचे आजपर्यंत ५४ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अकलूजकर कुटुंबीय आणि कुलकर्णी कुटुंबीय यांनी परिश्रम घेतले.माळशिरस शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सोमेश्वर महादेव मंदिर आहे.हे मंदिर चाणुक्य कालिन आहे.या मंदिरात वराह व सप्तश्रुंगी कोरीव मूर्ती आहेत.त्या मुर्ती गावकऱ्यांनी सुस्थितीत ठेऊन त्याचे पावित्र्य जपावे असे जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ.प्राध्यापिका लता अकलूजजकर यांनी आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा