Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

*नारायण गडावरील महामेळाव्यासाठी -बार्शी तालुक्यात विविध गावांमध्ये "मराठा बांधवांचे "बैठकीचे आयोजन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

मराठा आरक्षण संदर्भात

नारायण गडावरील महा मेळावा 

करीता बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथील 

येमाई देवीची गरजवंत मराठा समाजाच्या वतीने महाआरती करत साकडे घालण्यात आले

 आनंद काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये मराठा समाजाच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे 

 या अनुषंगाने कोरेगाव येथील बैठकीमध्ये उपळाई ठोंगे व आगळगाव विभागातून जास्तीत जास्त समाजबांधव नारायण गडावरील महामेळावा करता उपस्थित राहणार असा निर्धार यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केला 



 तर आनंद काशीद यांनी मराठा समाजाला आत्ता आपली एकी कायम ठेवीत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जरांगे पाटलांच्या माध्यमातून सोडून घेण्याकरता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहन करून हीच वेळ आहे लक्षात ठेवा समाज बांधवांना आता नाही तर परत कधीच नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे नारायण गडावरील 12 तारखेला होणाऱ्या दसरा मेळावा करता मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली असून अशा भावना आनंद काशीद यांनी व्यक्त केल्या 

 यावेळी मराठा समाज बांधवांसह वंजारी लिंगायत धनगर समाज बांधव देखील या बैठकीला उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा