*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
------- ज्यांनी २० वर्षात विकासाच्या नावाने बोंब करत नुसता मलीदाच खाल्ला, जातीपातीत, भावकीत भांडणे लावणारे हर्षवर्धन पाटील यांना की ज्यांनी गावोगावी निधी देवून गावे व स्थानिक कार्यकर्ते सक्षम केले अशा दत्तात्रय भरणे यांना विजयी करावे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले.
गिरवी (ता.इंदापूर) येथे महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रशांत पाटील, हनुमंत कोकाटे, दत्तात्रय घोगरे, महादेव घाडगे, आण्णासाहेब कोकाटे, संग्रामसिंह पाटील, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, पांडुरंग डिसले, अरूण क्षिरसागर, नवनाथ रूपनवर, सुरेश शिंदे, धैर्यशील पाटील, संतोष क्षिरसागर, जालिंदर गायकवाड, दत्तात्रय घोगरे, शितल कांबळे, संतोष सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत ढोले पुढे म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक कार्यकर्त्यांना जवळ बसण्याचाही अधिकार नव्हता. परंतू दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे लांबचा, जवळचा, जातीभेद केला जात नाही. तर येणाऱ्या सर्वांनाच समानतेची वागणूक देवून काम करून समाधानाने पाठवले जाते.
गिरवीचे उपसरपंच दादासाहेब क्षिरसागर म्हणाले, विकासरत्न आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावाच्या विकासासाठी भरघोस निधी देवून उत्कृष्ट विकास घडवून आणला आहे. इंदापूर तालुक्यातील जलजिवन मधील पिण्याच्या पाण्याची पहिली योजना कार्यान्वित केली आहे. प्रत्येक वाड्यावस्त्यावर रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. तर फिल्टरचे पाणी, आरोग्य सुविधा आदि सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदार जागरूक असून सुप्त पध्दतीने मतदान करून भरणे मामांना चांगल्या पद्धतीने मतदान घडवून आणणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव शिरसागर यांनी केले तर आभार अरुण क्षीरसागर यांनी मांडले कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - गिरवी येथील घोंगडी बैठकीत बोलताना मान्यवर दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा