Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

आमदार दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी सिनेअभिनेते बाबा गायकवाड यांनी भरणे मामांचे कुलदैवत श्री बिरोबा देवाला दुग्धाभिषेक घालून साकडे घातले.

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

----- आमदार दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी सिनेअभिनेते बाबा गायकवाड यांनी सहकुटुंब सहपरिवार भरणे मामांचे कुलदैवत भरणेवाडी येथील श्री बिरोबा देवाला दुग्धाभिषेक घातला. याप्रसंगी बाबा गायकवाड म्हणाले की, दत्तामामा भरणे कॅबिनेट मंत्री व्हावेत या करिता बिरोबा चरणी अभिषेक घातला आहे. आमचे श्रद्धास्थान असलेले बिरोबा दैवत नेहमीच मामांच्या पाठीशी आहे. यापूर्वी ५० किलोमीटर पायी वारी करून श्री केदारनाथ चरणी दत्तामामा आमदार व्हावे या करिता केलेली मागणी पूर्ण झाली आहे. मी सिनेअभिनेता असलो तरी मागणी पूर्ण झाली. मी सिनेअभिनेता असलो तरी राजकारण आणि सिनेसृष्टी ही वेग-वेगळी दुनिया आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील पण दत्ता मामांवर माझे वैयक्तिक प्रेम आहे. मी आज जो काही आहे तो फक्त दत्तामामांमुळे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी माझे कुटुंब काहीही करू शकते. यावेळी पत्नी सुलोचना गायकवाड, मुलगा पृथ्वीराज गायकवाड व मुलगी सायली गायकवाड उपस्थित होते.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा