Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

*सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकाच्या निर्यातीस केंद्र सरकारने चालना द्यावी.खा. धैर्यशील मोहिते-पाटील‌*


 

*उपसंपादक --- नूरजहाँ शेख*

*टाइम्स ४५ न्यूज मराठी*

सोलापुर जिल्ह्यात केळी लागवडीखाली क्षेत्रात प्रचंड वाढ होत असुन सुमारे १९ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आलेले आहे.महाराष्ट्रातील एकुण केळी निर्यातीपैकी सुमारे ५८% निर्यात सोलापुर जिल्ह्यातुन होते.गेल्या वर्षी महाराष्ट्रातुन सुमारे ११ लाख २३ हजार ५२४ हजार मेट्रीक टन केळी एक्सपोर्ट झाली यातील सुमारे ६ लाख ४८ हजार २६२ मेट्रीक टन केळी सोलापुर जिल्ह्यातुन एक्सपोर्ट झाली आहे.एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यातुन सुमारे २५ हजार कंटेनर केळीची निर्यात झाली. त्यातील १६ हजार कंटेनर केळी सोलापुर जिल्ह्यातुन निर्यात झाली आहे.



            केंद्र सरकारने निर्यातीस चालना देण्यासाठी राबवलेल्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापुर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात समावेश झाला पाहिजे यासाठी आज खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल साहेब यांची भेट घेवुन चर्चा केली व त्या संदर्भात निवेदन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा