*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
बार्शी तालुकासंभाजी ब्रिगेडच्या वतीने" राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ मासाहेब यांची जयंती उत्साहात साजरी. करण्यात आली
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी जिजाऊंचे प्रेरणा घेऊन आजच्या महिला, मुलींनी सक्षम व निर्भय होणे गरजेचे आहे जिजाऊ मा साहेबांचा विचार हा डोक्यात घेऊन जगातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलींनी आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे. संकट ही सर्वांनाच असतात त्या संकटावरती मात करण्याची प्रेरणा ही जिजाऊ मा साहेबांपासून घेतल्यास जगातील कोणत्याही संकटावर मात करायचे ताकद निर्माण होऊ शकते असा विचार यावेळी आनंद काशीद यांनी व्यक्त केला. या प्रारंभी मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पांडुरंग घोलप ,विक्रम बापू घाईतिडक, रणजीत पाटील ,मनोज शिंदे, गणेश भोसले, राजवीर काशीद, रणवीर काशीद ,यांच्यासह तरुण आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा