Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

*अभिनेता सैफअली खान यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना वाचवण्याचे षडयंत्र---- इकबाल मुल्ला, पत्रकार (सांगली)*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

सैफअली खान यांच्या हल्ल्यातील "खऱ्या" मारेकऱ्याला वाचवण्यासाठी फार मोठे षडयंत्र खेळले जातं आहे का ??? भगवा /ऑरेंज रुमाल खांद्यावर घेतलेला तो "तरुण" कोण ?? CCTV तील सैफ ला मारणाऱ्या तरुणाला सैफ आणि घरातील 3 लोक ओळखतात. मग ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी तरुणाची ओळखपरेड का घेतली जातं नाही ?? दोन्ही तरुण /संशयित आरोपी वेगवेगळे दिसतं आहेत हें "सूर्यप्रकाशाइतके" स्पष्ट असताना खऱ्या मारेकऱ्याला वाचविण्यासाठी इतका "खटाटोप" का ??? 

CCTV मध्ये मारेकऱ्याचा चेहरा "सुस्पष्ट" दिसतं असताना तो हल्लेखोर पोलिसांना का सापडत नाही ??? त्याला का "लपवले" जातं आहे ???


खोदा पहाड आणि निकला चुहा !



 सैफ च्या घरात "जिन्यावरून" येणारा तरुण वेगळा आहे आणि पोलिसांच्या 30 टीमच्या माध्यमातून "शोधकार्य" करून बांगलादेशी पकडलेला तरुण वेगळा आहे. वरील 2 फोटोवरून याची कल्पना वाचकांना येऊ शकते. भारतातील दैनिक भास्कर या अग्रगण्य दैनिकाने या फुटेजची फॉरेन्सिक टेस्ट केली. यामध्ये CCTV मधील तरुण फारच "तरुण" आणि उंच आहे. आणि ताब्यात घेतलेला तरुण थोडा "वयस्कर"आणि बुटका आहे. CCTV मधील तरुणाचे ओठ ,नाक भुवया,चेहरा आणि पकडलेल्या बांगलादेशी तरुणाचे ओठ नाक , भुवया, चेहरा हा पूर्णपणे वेगळे असल्याचा "अहवाल" त्यांना मिळाला आहे. 

कोणत्याही अशिक्षित व्यक्तीने दोन्ही फोटो पाहिले तरीही दोन्ही व्यक्ती निरनिराळ्या असल्याचे स्प्ष्टपणे दिसते.

मग जाणीवपूर्वक सैफअली चा तो चोर "बांगलादेशी तरुण आहे हें सांगण्याचे कारण काय असावे ?? याचे "गौडगंबाल" काय ? पोलिसांवर मुख्यमंत्री अर्थात गृहखात्याच्या दबाव असावा का ??? कारण CCTV मधील तरुणाच्या खांद्यावर असलेला "ऑरेंज / भगवासदृश्य" रुमाल काय इशारा देत आहे ??? दिल्लीत भाजपचे तुणतुणे वाजवणाऱ्या कुमार विश्वास यांनीदेखील काही दिवसापूर्वी सैफअली वर त्याने मुलाचे नावं तैमूर ठेवल्याबाबत कठोर #टीका केली होती.त्यामुळे कुमार विश्वास यांच्या समर्थकांकडून सैफच्या घरात हें "हत्येचे" "नियोजन" केले गेले का ?? व याच कारणामुळे खऱ्या मारेकऱ्याला वाचवण्याचे हें षडयंत्र असेल का ?? अरविंद केजरीवाल अडचणीत यावेत व "दिल्ली विधानसभा" निवडणुकीत भाजपाला फायदा होईल या हेतूने जाणीवपूर्वक बांगलादेशी तरुणाला यात "गोवले" जातं आहे का ???

आता सैफअली खाननेच मला चाकूने "जखमी" करणारा आरोपी "वेगळा" होता आणि पोलिसांनी पकडलेला तरुण वेगळा आहे हें प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे "जाहीर" करावे.जेणेकरून प्रशासन तसेच अन्य संबंधित व्यक्तींचा खरा उग्र "चेहरा" जगासमोर येईल. 


. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा