*इक्बाल बाबासाहेब मुल्ला( पत्रकार)*
*सांगली*
*मो:-8983 587160
मित्रांनो, परमेश्वर प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही त्यामुळे त्याने मनुष्यांना "देवदूतांच्या स्वरूपात पाठविलेले असते.
2 महिन्यापूर्वी सांगलीतील अल्ताफ मुजावर या *टेलर* वर काळाचा घाला पडला होता. 8 लाख रुपयांचे "बिल" झाले होते.
मी सोशल मीडियावर अल्ताफ मुजावर यांच्याबद्दल आर्थिक *मदतीचे* आवाहन केले होते. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत माझ्या वाचकांनी - मित्र - हितचिंतकांनी मुजावर कुटुंबियांना *दोन लाख* पेक्षा जास्त रुपयांची मदत केली.आणि अल्ताफ मुजावर यांचे *प्राण* वाचले.
मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या मदतीची *अपेक्षा* व्यक्त करत आहे. प्रत्येकाच्या घरात लहान हसणारी - बागडणारी मुले असतात. सांगलीतील "पाथरवट गल्ली",खणभाग येथील *मुआज इस्लामपुरे* या मुलावर आज संकट आवासून उभे आहे. व त्याला मदत करणे हें आपले कर्तव्यचं आहे. मुआजला *निमोनिया* झाला असून *भारती हॉस्पिटल* 4 था मजला, अतिदक्षता विभाग,सांगली येथे त्याच्यावर उपचार सुरु असून गेल्या 22 दिवसापासून तो *व्हेंटिलेटर* वर असून त्याची *मृत्यूशी झुंज* सुरु आहे. मुलाची प्रकृती "नाजूक" असून 8 दिवसापासून त्याच्या *फुफुसात पाणी* झाले असून गळ्यात "छिद्र" पाडून पाईप घातले आहे. त्याच्या शरीरात एकूण *3 पाईप* असल्याने त्याला दररोज *ताप* येत आहे. केवळ 7 वर्षाच्या मुआज चा त्रास आणि "वेदना" पाहून अक्षरशः अंगावर "शहारे" येत आहेत. सलग 22 दिवस मुआज बेडवर असल्यामुळे त्याच्या *डोक्याला जखम* देखील झाली आहे. सध्या प्रकृती स्थिर आहे परंतु *महात्मा फुले* योजनेअंतर्गत असणारी रक्कम मुआज च्या उपचारासाठी "कमी" पडत असल्याने "दिवसाची रात्र" करून मुआजला वाचविण्यासाठी *शर्थीचे* अथक "प्रयत्न" करणारे त्याचे मानलेले आजोबा *जमीर पाथरवट* आज "हताश" झाले आहेत.
आतापर्यंत त्यांनी 1,26000 रुपये मेडिकल च्या *औषधासाठी* त्यांनी खर्च केले आहेत. आणि केवळ 2000 रुपये भारती हॉस्पिटल मध्ये भरले आहेत. आता यापुढे खर्च करणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारती हॉस्पिटलमध्ये आणखी *15-20 दिवस* अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल असे डॉक्टरांचे मत आहे. तात्पर्य एकूण 250000 एवढा खर्च अजून लागणार असल्याने त्यांच्या कुटुंबियांना *पैशाची* नितांत आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे मुआजचे *प्राण* वाचवण्यासाठी आपण "आर्थिक मदत" मुआज च्या *आईच्या* मोबाईल वर करावी ही नम्र विनंती. त्यांच्या आईचा *गुगल पे/ फोन पे* चा स्कॅनर वर दिला आहे. त्याशिवाय जमीर पाथरवट यांचा "मोबाईल क्रमांक" देखील दिला आहे.आपण या पेशन्टच्या सत्यतेचि *खातरजमा* करू शकता आणि मदतही करू शकता.
सांगलीतील *इमॅन्युएल इंग्लिश स्कूल* मध्ये मुआज हा पहिली ला शिकतो.आणि त्याच्याच वर्गात माझा मुलगा *सुहेब* ही आहे. दोघे "जिवलग मित्र" आहेत. मुआज 8 दिवस शाळेत का आला नाही म्हणून सुहेबने मुआज ला *फोन* केला असता त्याच्या आईने तो भारती हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये *सिरीयस* आहे असे रडत सांगितले. त्यानंतर *मी* भारती हॉस्पिटल मध्ये जाऊन "परिस्थिती" पाहिली. डॉक्टरांना *सर्वोत्तम* उपचार देण्यासाठी विनंती केली. त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती "साधारण" असल्याने मी सर्व वाचकांना आज त्यांच्या आर्थिक मदतीसाठी आवाहन करत आहे. वरील दिलेल्या *स्कॅनरवर* गुगल पे / फोन पे द्वारे आर्थिक मदत करून सहकार्य करावे ही विनंती.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा