संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
जकातच्या पैशातुन गरीब आणि *गरजवंत* कुटुंबाना कायमस्वरूपी *अपंग - विकलांग* बनवण्यापेक्षा "गरजवंत" कुटुंबाना "स्वयंरोजगार" देऊन *आत्मनिर्भर* बनवणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
वास्तविक गरजवंतांना जकातच्या माध्यमातून *पैसाच* का हवा ??? त्या पैशाच्या माध्यमातून कायमस्वरूपी *रोजगार* मिळाला तर भविष्यात कोणालाही कुणाच्या पुढे "हात पसरवण्याची" गरज भासणार नाही. आणि ते कुटुंब पुढील 5 वर्षात "उद्योजक" बनून स्वतः *जकात* देण्याच्या पात्रतेचे बनतील. रमजानचा अपवाद वगळता अन्य *11 महिन्यात* देखील गरजू - गरजवंतांना आर्थिक मदत करण्याचा माझा "संकल्प" आहे.
🌺 *शिलाई मशीन..एक उत्कृष्ठ "स्वयंरोजगार" !*
वाचकांना आश्चर्याचा धक्का बसेल, महाराष्ट्रातील *सांगली* शहरात केवळ शिलाई मशीनच्या माध्यमातून "10 ते 15 हजार" कुटुंबाना रोजगार मिळतो.
सांगली जवळील *माधवनगर / अहिल्यानगर* आणि इतर शहरातून *पिशवी/शर्ट* आणि इतर *गारमेंट* च्या शिलाईच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला किमान *15 - 20 हजार* मिळतात. आज जकातचा पैसा एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी *उद्योजक* म्हणून उभा करू शकतो. व तो कुटुंबाच्या "आशीर्वादाचा" केंद्रबिंदू ठरू शकतो.
केवळ शिलाई मशीनच नव्हे तर ज्या व्यवसायात महिलांना *रुची* आहे , आवड आहे, तो व्यवसाय करण्यासाठी देखील गरजू महिलांना *आर्थिक सहकार्य* करण्याचा आमचा "मनोदय" आहे.
स्वतः मी *श्रीमंत* 10 लोकांची एक *टीम* तयार करत असून त्यामाध्यमातून निदान स्थानिक असणाऱ्या सांगलीतील गरजू कुटुंबाना *शिलाई मशीन* देण्याचा माझा संकल्प आहे. त्या शिलाईमशीन च्या माध्यमातून एका कुटुंबाचा *उदरनिर्वाहाचा* प्रश्न मार्गी लागू शकतो.
माझ्या या उदात्त कल्पनेला "पंख" देण्यासाठी,माझ्या "स्वप्नाला" बळ देण्यासाठी सांगलीतील माझे मित्र - हितचिंतक,शिवाजी मंडई रोडवरील *समीर सुईंग मशीन* चे मालक "समीर चाऊस" आणि "मुबीन चाऊस " यांनी मला सहकार्य करण्याचा "शब्द" दिला असून या योजनेच्या शुभारंभालाचं मला "मोफत" एक *एटोमेटिक शिलाई मशीन* देण्याचे अभिवचन दिले आहे. एक एटोमेटिक शिलाई मशीन किमान *28000 रुपयांचे* असते याची वाचकांनी नोंद घ्यावी. त्याशिवाय माझे जिवलग मित्र उद्योजक *अरिफ मुल्ला* यांनी देखील भरीव योगदान देण्याचा "मनोदय" व्यक्त केला आहे.
माझ्या अनेक *मित्रानी* देखील या "पुण्य" कार्यात आपापले योगदान देण्याचे मान्य केले आहे. एकीचे बळ मिळते फळ ..ही म्हण समयोचित वाटते.
आज काही *बचत गटाच्या* माध्यमातून महिलांचा *गैरफायदा* घेतला जातो, त्यांचे "खच्चीकरण" केले जाते हा अनुभव आहे. त्यामुळे महिलांना स्वतःच्या घरीच कामं करून त्यांना सन्मानाने पैसे मिळू शकतात.
*महिलांना* पैसे देऊन परावलंबी बनवण्यापेक्षा त्यांना "उत्पादक" बनवून "उद्योजक" बनविण्याचा निर्धार *महाराष्ट्रातील श्रीमंत मुस्लिमांनी* करायला हवा. निदान सांगलीतील श्रीमंतांनी याकामी "पुढाकार" घ्यावा..माझ्याशी संपर्क साधून गोरगरीब तसेच गरजवंतांना "आत्मनिर्भर" बनविण्याच्या माझ्या संकल्पनेला "बळ" द्यावे ही विनंती.
. इकबाल बाबासाहेब मुल्ला
( पत्रकार )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा