Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ मार्च, २०२५

बारूळ ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विज्ञान मेळावा संपन्न


  

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

बारूळ शाळेत विद्यार्थ्यानी दाखवली विज्ञानाची किमया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ तालुका तुळजापूर येथे अपूर्व विज्ञान मेळावा साजरा करण्यात आला त्या मेळाव्याच्या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील मातोश्री हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध डॉ. योगिनी जाधव साबळे या उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख होते. तसेच बाळू गावच्या सरपंच सिंधुताई सुपणार,बाबुराव ठोंबरे, माजी सरपंच शहाजी सुपणार, जवाहर विद्यालय अणदुरचे .मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मन्मथ ठोंबरे,उपाध्यक्ष सुधीर लांडगे , सदस्य- पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

               यावेळी विज्ञानावर आधारित रांगोळी,चित्रकला, प्रयोग सादरीकरण या स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेमध्ये 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर रांगोळी मध्ये 16 तर प्रयोग सादरीकरणमध्ये तब्बल 84 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक रांगोळीचे सुंदर रेखाटन केले होते. तर वैज्ञानिक चित्र मध्येही इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी चित्रे रंगकाम केली होती. प्रयोग साजरीकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या प्रयोगातून वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करून सर्व मान्यवर,नागरिकांना दाखवल्या. या अपूर्व विज्ञान मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण विज्ञानाबद्दल कुतूहल, जिज्ञासा निर्माण होते.

                 प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे हे सिद्ध यावेळी डॉ. योगिनी जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगाच्या पाण्यातून अतिशय समाधान व्यक्त केले व पुढे चालून असे विद्यार्थी शास्त्रज्ञ बनतील अशी अपेक्षा व्यक्त शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख यांनीही विद्यार्थ्यांच्या दाखवलेल्या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या अंगी का व कसे असे प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थी त्यावरील उपाय शोधतील अशी अपेक्षा व्यक्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषय शिक्षक आम्ही मुलांनी यांनी विज्ञानाची पार्श्वभूमी स्पष्ट करून सांगितली व अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यामागचा हेतू स्पष्ट करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गटात विभागणी करून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात पारितोषिकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते शेवटी करण्यात आले.असा हा अपूर्व विज्ञान मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात शाळेमध्ये संपन्न झाला.त्यामध्ये प्रथम व्दितीय ,तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

             या मेळाव्याचे नियोजन व विद्यार्थ्यांचे मनोबल पाहून डॉ.योगिनी जाधव यांनी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम शाळेतील शिक्षिका रूपाली गडेकर ,कल्पना चव्हाण, सरोजिनी जाधव ,शीतल वाघमारे , मनीषा राजगुरू, प्राथमिक पदवीधर बालाजी पवार, शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख आदींनी घेतले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिन मुलाणी यांनी तर आभारप्रदर्शन बालाजी पवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा