Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ मार्च, २०२५

*उस्मानाबाद, धाराशिव येथे केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचा भव्य ट्रॅक्टर रॅली मोर्चा संपन्न*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात उस्मानाबाद जिल्हा व तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ट्रॅक्टर (रॅली) मोर्चा आंदोलन. करण्यात आले हा मोर्चा काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता या आंदोलनाद्वारे काँग्रेस कमिटीच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आले आहे



१) विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने कर्जमाफी सारखे अनेक आश्वासन दिली परंतु प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर विसर पडलेला दिसत आहे.


२) शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार होते त्याचे काय झाले ?


३) मागेल त्याला सौर पंप अनेक शेतकऱ्यांनी नोंदी केल्या प्रतक्षात अजुन एकालाही मिळाला नाही.


४) रोजगार हमी योजना ची कामे चालू कधी होणार. ती तातडीने चालू करावीत.


५) तुळजापूर, तमालवाडी ड्रग्स प्रकरणात सखोल चौकशी करून पकडलेल्या आरोपीचे सी.डी.आर (CDR) तपासून कारवाई करावी.


६) ठिबक, तुषार सिंचन चे अनुदान अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते देण्यात यावे.


७) कृषी विभागा अंतर्गत अनुदानावर वाटप होणारे बी बियाणे व औषधे हे ठेकेदारा मार्फत खरेदी न करता शेतकऱ्यांचा स्वतः खरेदी करण्याची परवानगी मिळावी.


८) महायुती सरकार च्या साक्षीने नंबरप्लेट च्या माध्यमातून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे तिप्पट पट वाढ करण्यात आलेली आहे. ती वाढ कमी करून वाहनधारकाना दिलासा देण्यात यावा.


अश्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यामधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सोमवार दिनांक ३ मार्च पासून राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी ट्रॅक्टर रॅली मोर्चा सोमवार, दि.३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वा. स्थळ - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, खाजानगर येथून भव्य ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढण्यात आला होता याप्रसंगी

 प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज संस्थाचे मा. पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल, सेलचे जिल्हा, तालुका अध्यक्ष, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा