*संपादक -- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सांगोला जि. सोलापूर येथील 'साबिया शकील तांबोळी 'हिने MBBS प्रशिक्षण परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले असून ती फर्स्ट क्लास मध्ये पास झाली असून सांगोला येथील -लाईफ लाईन मेडिकल- स्टोर चे शकील तांबोळी यांची ची मुलगी आहे
साबिया तांबोळी हिचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथे झाले असून हैदराबाद येथील (Sadan institute of medical science Hyderabad) मध्ये MBBS शिक्षण पूर्ण केले असून काल दिनांक 17 एप्रिल 202500 रोजी आलेल्या MBBS परीक्षेच्या निकालात तिने फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाली आहे
या उज्वल यशाबद्दल बोलताना साबिया तांबोळी म्हणाली की माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी MBBS शिक्षण पूर्ण करून रुग्णांची सेवा करावी ते मी जिद्दीने व मन लावून अभ्यास करून उत्तीर्ण होऊन वडिलांचे स्वप्न साकार केले असल्याचे मत तिने "टाइम्स 45 न्यूज मराठी "शी बोलताना व्यक्त केले
विशेषतः सांगोला येथील तांबोळी समाजात प्रथमच MBBS डॉक्टर झाल्याचा मान तिने मिळवला असून तिच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा