Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २० जुलै, २०२५

*पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शनासाठी आलेल्या ३ भाविक महिला चंद्रभागा नदीत बुडाल्या ---दोघींचे मृतदेह सापडले तर आणखी एकीचा शोध सुरू...!*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

सोलापूर- विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांवर शनिवारी सकाळी काळाने घाला घातला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये स्नान करताना तीन महिला भाविक बुडाल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. तर एक अनोळखी महिला आहे. तिची माहिती मिळू शकलेली नाही.

ही घटना शनिवारी सकाळी घडली. या तीन महिला भक्त पवित्र स्नानासाठी पंढरपूरजवळील पुंडलिक मंदिराच्या जवळ चंद्रभागा नदीमध्ये उतरल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहाची गती वाढली असून पाण्याची पातळीही वाढली आहे. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे या महिलांना अचानक जोरदार प्रवाहात ओढले आणि त्या बुडाल्या.

या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार माजला. आसपासच्या लोकांनी आणि इतर भाविकांनी आरडाओरड करून मदत मागितली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेनंतर तात्काळ स्थानिक प्रशासनाचे जवान, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर दोन महिलांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या महिलेचा शोध अजूनही सुरूच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा