Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ५ जुलै, २०२५

*आषाढी वारी निमित्त 'संतश्रेष्ठ तुकाराम माऊली व तुकाराम महाराज' यांच्या पालख्या पंढरपूर मध्ये प्रवेश करताना खा- प्रणिती शिंदे यांनी स्वागत करून वाखरी येथील रिंगण सोहळ्यात सहभागी झाल्या.*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी


*रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी ...*

*दिव्य सोहळा पाहुणी डोळा देह हा माऊली माऊली झाला...*

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली, तुकाराम महाराज व अन्य पालख्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि पंढरपुरात प्रवेश करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वागत केले. तसेच वाखरी येथील बाजीराव विहीर परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण यात खासदार प्रणिती शिंदे सहभागी होऊन वारकऱ्यांसोबत भक्तिमय वातावरणात 'ज्ञानेश्वर माऊलीऽऽ; ज्ञानबा तुकारामऽऽ'... या नामघोषात टाळ घेऊन तल्लीन झाल्या होत्या. तसेच वारकऱ्यांसोबत चालत फुगडीचे आनंददायी क्षण ही अनुभवले. आणि नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले.

          पवित्र अश्या आषाढी वारीचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं. माऊलींच्या वारी सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा आणि या परंपरेचा भाग होता येणे, हे निश्चितच आत्मिक समाधान आणि अध्यात्माची सर्वोच्च अनुभूती देणारे क्षण होते असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा