Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १ सप्टेंबर, २०२५

भाजपा पुणे जिल्हा नवीन कार्यकारणी जाहीर....!* *प्रविण माने यांच्यावतीने मान्यवरांचा सन्मान


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

-----भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये इंदापूरचे आकाश'जी कांबळे यांना भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस पद तर गजानन भाऊ वाकसे यांना ओबीसी मोर्चा अध्यक्ष पुणे जिल्हा, शिवाजीराव निंबाळकर हे जिल्हाउपाध्यक्ष, नानासाहेब शेंडे यांना जिल्हा चिटणीस पद, तसेच प्रवीणकुमार शहा यांना पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली.


या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा प्रविण माने यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र'जी मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकसीत भारताची व भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


नव्याने करण्यात आलेल्या या निवडीमुळे भविष्यात पक्षाची ताकद आणखी वाढणार असून, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षाशी जोडला जाणार असल्याची भावना यावेळी प्रविण माने यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा