कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- बावडा येथून मुंबई येथील मराठा अंदोलकांना खरडा, भाकरी, चपाती, धपाटे, लोणचेची शिदोरी ग्रामस्थ, मुस्लिम व मराठा समाज बांधवांच्या वतीने पोहोच करण्यासाठी आज गोळा करून वाहनाने मुंबईकडे पाठवण्यात आले. एक घर एक शिदोरी याप्रमाणे शिदा देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिदोरी गोळा करण्यात आला.
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईला गेले आहेत. त्यांच्या जेवण्याची सोय करणे शक्य नसल्याने सामाजिक संस्था, गावातील घरोघरी अंदोलकांना जेवणासाठी मुस्लिम व मराठा समाजातील महिलांनी शिदोऱ्या बनवून दिल्या.
भाकरी, धपाटी, चटणी, खरडा, लोणचे, फळे, पाणी व्यवस्थित पॅकींग करून मुंबई कङे पाठविण्यात आला. बावडा येथील ग्रामस्थ, मुस्लिम समाज व सकल मराठा समाजाच्या वतीने शिदोरी गोळा करून पाठवण्यात आली. एक घर एक शिदोरी या संकल्पनेनुसार आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार भाकरींची शिदोरी घेऊन वाहन मुंबईला आज रवाना झाले. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ, सकल मराठा व मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते.
फोटो - बावडा येथील ग्रामस्थ, मुस्लिम समाज व सकल मराठा समाजाच्या वतीने शिदोरी गोळा करून पाठवण्यात आली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा