संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
मोहोळ | ०१ सप्टेंबर २०२५
मोहोळ तालुका व परिसरातील प्रवासी, व्यापारी, शेतकरी आणि भाविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळापासून बंद असलेला सिद्धेश्वर एक्सप्रेस (गाडी क्र. 12116 सोलापूर–मुंबई व 12115 मुंबई–सोलापूर) याचा मोहोळ रेल्वे स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून आज त्याबाबतचा अधिकृत आदेश जाहीर झाला आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शक्य झाला. त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. या निर्णयामुळे मोहोळ व परिसरातील प्रवासी वर्ग, व्यापारी व शेतकरी यांना प्रवास अधिक सुलभ होणार असून वेळेची बचतही होणार आहे.
स्थानिक नागरिक, व्यापारी व शेतकरी यांनी या प्रयत्नांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा