Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

विकास लोहपुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट प्रेरणादायी-- प्रदीप गारटकर



इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार, आमचे जेष्ठ मार्गदर्शक व दूरदृष्टी असलेले नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची सदिच्छा भेट प्रेरणादायी ठरली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक दिवसीय चिंतन शिबिर नागपूर येथील संपन्न झाले. यानिमित्त प्रदीप गारटकर हे नागपूर येथे गेले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर येथे असल्याचे पाहून प्रदीप गारटकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान विविध विकासकामांबाबत, पायाभूत सुविधांमधील सुधारणा, नागरी सुविधा, रस्ते व महामार्ग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नितीन गडकरी यांच्याशी 

प्रदीप गारटकर यांची सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे इंदापूर तालुक्यातून जाणाऱ्या पालखी महामार्गाच्या कामाला गती येणार असल्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य, इंधनामध्ये इथेनॉल, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग निर्मिती, त्यांच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती नेहमीच प्रेरणादायक आहे. श्री. गडकरी साहेब यांचे मार्गदर्शन लाभणे ही नेहमीच एक प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी अनुभूती असते. त्यांच्याकडून मिळणारे विचार, धोरणात्मक दिशा ही आगामी काळात समाजोपयोगी कामासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा आत्मविश्वास शेवटी प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला. आदरणीय

नितीन गडकरी साहेब यांनी दिलेल्या वेळेसाठी आणि मार्गदर्शनासाठी श्री. गारटकर यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.

प्रदीप गारटकर हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेते असून त्यांच्या समाजकार्याची सुरुवात प्रथम पतीत पावन संघटनेतून झाली. त्यानंतर इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झाल्यानंतर श्री. गारटकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासास सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यानंतर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आमदारकीची देखील निवडणूक तीन वेळा लढवली. या काळात ते भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे उमेदवार म्हणून देखील त्यांनी निवडणूक लढविली होती. या कालावधीत त्यांचे नितीन गडकरी यांच्याशी नेहमी संबंध येऊन त्यांचा स्नेह वृद्धिंगत झाला. त्यामुळे या भेटीस अनन्यसाधारण महत्त्व आहेत. उजनी धरण पाणलोट क्षेत्राचा सी प्लेन योजनेत समावेश झाला नाही, त्यामुळे श्री. गारटकर यांनी हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गातून मार्गी लावावा असे आवाहन उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील युवा शेतकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा