इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
देशाचे लोकप्रिय जगप्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ग्रामपंचायत ग्रामसभेत साजरा करण्यात आला. पोलीस पाटील संतोष कोरके यांच्या पुढाकाराने तसेच युवा सरपंच गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित केक कापून त्यांचे सामूहिक अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी सरपंच गणेश पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर पंतप्रधान म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध असून त्यांच्या धोरणामुळे आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची बनली आहे. अमेरिकेच्या दादागिरीला घाबरून न जाता त्यांनी अमेरिकेची जागतिक दादागिरी मोडून काढली आहे. देशात प्रथम केंद्रीय सहकार खाते निर्माण करून सहकार चळवळीला त्यांनी नवसंजीवनी दिली आहे. युवक, युवती, महिला, कामगार, उद्योजक तसेच शेतकरी यांचे सक्षमीकरण करण्यास त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ग्रामपंचायत तसेच पंचायत राज मजबूत करण्यासाठी त्यांचे अनमोल योगदान आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा देत आहे. जागतिक दहशतवादाविरोधात त्यांनी आवाज उठविला असून त्याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे.
पोलीस पाटील संतोष कोरके म्हणाले, भारतीय हिंदुत्वाला त्यांनी जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण मान्यता मिळवून दिले असून भारतीय योगाला त्यांनी आंतरराष्ट्रीय जगमान्यता मिळवून दिली आहे. त्यांच्या धोरणामुळे देश खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या सर्वांगीण विकास कामांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे काम करत असून पक्षाने आम्हाला सकारात्मक मदत करावी, आमचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोरके, देविदास जमदाडे, उमेश श्रीखंडे, प्राध्यापक विजयकुमार कोरके,उद्योजक विजय गायकवाड, पत्रकार प्रतिनिधी आण्णासाहेब पवार, शहाजी काळे, डॉ. अनिरुद्ध नाईकनवरे, गावकामगार तलाठी दिगंबर डोईफोडे, कृषी सहाय्यक श्री. वास्ते, ग्रामसेवक श्री. भुजबळ, अंगणवाडी, आशा सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा