अकलूज--- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित,शंकरराव मोहिते महाविद्यालयात सोलापूर युवा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा युवा महोत्सव (उन्मेश सृजनरंगाचा) दि. ७ ते १० ऑक्टोंबर २०२५ या दरम्यान सांगोला महाविद्यालय सांगोला येथे संपन्न होत आहे.
शंकरराव मोहिते महाविद्यालयाने डॉ.विश्वनाथ आवड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवात तृतीय क्रमांकाने केलेली सुरुवात पुढे तीन वेळा उपविजेतेपद व प्रथम क्रमांक तसेच 'गोल्डन बॉय दि इअर','गोल्डन गर्ल दि इअर' पुरस्कार प्राप्त करून सोलापूर विद्यापीठाची दोन वेळा जनरल चॅम्पियनशिप' पटकावून महाविद्यालयास एका उंचीवर नेण्याचे काम सांस्कृतिक विभागाने केले आहे.आज या युवा महोत्सवात प्राविण्य मिळवलेले महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी चित्रपट क्षेत्रात, टी.व्ही.मालिकांमध्ये कलाकार व दिग्दर्शक म्हणून यशस्वीरित्या काम करीत आहेत.
या युवा महोत्सवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर व डॉ. विश्वनाथ आवड यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर ताटे-देशमुख यांच्या नेतृत्वात व दिग्दर्शक औदुंबर भिसे, रोहित देशमुख,मनोज वर्धम,वैभव आंबेकर,नागनाथ साळवे,विलास शिंदे यांचे व सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थी विविध स्पर्धा कला प्रकारांचा सराव जोमाने करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा