सोलापूर प्रतिनिधी आबिद बागवान
टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या अनमोल केवटे याचा लातूरमध्ये भल्या पहाटे खून झाल्याची घटना घडली असून मयत केवटेवर मंद्रूप मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
लातूर मधील स्थानिक दैनिक भूकंप मध्ये लागलेल्या बातमीनुसार अनमोल केवटे याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी अनमोल केवटे हा लातूरला गेला होता परत येताना मध्यरात्री एकच्या सुमारास ईरटीका गाडीमधून येत असताना त्यांच्या आडवी क्रुझर लावून आतील अनमोल केवटे याचा गळ्यावर वार करून खून करण्यात आला. त्याच्यासोबत असलेली महिला सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित महिला ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी ईरटीका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्या फिर्यादीवरून लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान केवटे याचा मृतदेह मंद्रूप गावी आणून त्याच्यावर आज गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील राजकीय मंडळी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवटे याला काही दिवसांपूर्वी तडीपार करण्यात आले होते दरम्यान त्याचा नेमका खून कशामुळे झाला याचा तपास लातूर पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा