संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
कुर्डू गावातील बेकायदेशीर मुरूम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या फोनवरील संवादाने हे प्रकरण महाराष्ट्रभर प्रचंड गाजले आरोप प्रत्यारोप झाले
या प्रकरणाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा वाचा फोडलेले जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी दबलेले प्रकरण मीडियाच्या समोर आणत दुग्धभिषेक आंदोलन केले गेले दहा दिवस हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असताना आज करमाळा तालुक्यातील कंदर येथे खूपसे पाटलांच्या वतीने 20 फुटी बॅनर आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनात लावलेले आहे या
बॅनर वरील मजकूर
वुई सपोर्ट आयपीएस अंजना कृष्णा
वुई स्टॅन्ड आयपीएस अंजना कृष्णा
अशी वाक्य बॅनर वर लिहिलेली आहेत आणि अंजना कृष्णा बरोबर खूपसे पाटील यांचा फोटो पण या बॅनरवर आहे
यावेळी बोलताना खूपसे पाटील म्हणाले
ज्यांच्या नावात
मारुतीरायाच्या मातेचे नाव *“अंजना”*
तर आडनावात *“कृष्णा“* साक्षात भगवान श्रीकृष्णाचे नाव
तर *‘IPS अंजना कृष्णा’* ह्या कशा चुकीच्या असू शकतील
या संदर्भात
करमाळा तालुक्यात दिवसभर या बॅनर विषयी चर्चा रंगत असताना हा बॅनर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल झाला यावेळी याची कुन....कुन
..पोलिसांना लागली आणि पोलिसांनी स्वतःहून हा बॅनर खाली उतरवला
यावेळी उपस्थित युवक प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे भैया मंगवडे कार्यकर्ते उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा