संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
जिल्हास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ निवड समिती सदस्य म्हणून उमाकांत गायकवाड जावेद मुलांणी अशोक कोळी यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने देण्यात आले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व्दारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ क्रीडा स्पर्धाचे आयोजन नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी डोणज ता मंगळवेढा या ठिकाणी होणार आहेत.
तरी उपरोक्त स्पर्धेतून उत्कृष्ठ खो-खो खेळाडूं ०५ मुले व ०५ मुली निवड करण्यासाठी. उमाकांत गायकवाड (संघटना सचिव) जावेद मुलानी (राष्ट्रीय खेळाडू ) अशोक कोळी ( क्रीडा शिक्षक) यांची निवड समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तरी आपण
स्पर्धा स्थळी उपस्थितीत राहून सहकार्य करावे अशी विनंती पत्रद्वारे करण्यात आली आहे
जिल्हा
क्रीडा अधिकारी सोलापूर
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. जिल्हाधिकारी, सोलापूर.
२. मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा