विशेष प्रतिनिधी--एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युवक काँग्रेसकडून माळीनगर गटात उमेदवार उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक विकास, रोजगारनिर्मिती आणि शिक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांवर युवक काँग्रेसचा प्रचार केंद्रित राहणार असून, तरुण नेत्यांना पुढे आणण्याची संधी या निवडणुकीत मिळणार असल्याचे युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या निर्णयानंतर गटात चांगली राजकीय चैतन्य निर्माण झाले असून, विविध ग्रामपंचायतीतील तरुण कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार म्हणाले, “माळीनगर परिसरातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवणे हे आमचे प्राधान्य असेल.”प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेत्यांनीही युवक संघटनेला पूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली असून, स्थानिक स्तरावर आघाडीचे नियोजन पुढील काही दिवसांत जाहीर होईल. सामाजिक सलोखा, शिक्षण व जलव्यवस्थापन या विषयांवर युवक काँग्रेस आपला निवडणूक जाहीरनामा सादर करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा