Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

बारामतीत टॅक्स कन्सल्टंटला लुटणारे दोघे ताब्यात.. _दोन आरोपी अटकेत; बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई_


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- बारामती येथील तांबेनगर परिसरातील सम्राट वाईन शॉपीबाहेर एका टॅक्स कन्सल्टंटला मोटारसायकलवर बसवून लांब नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून एक विधी संघर्षित बालक आहे.

        दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी संपत भाऊसो थोरात (वय ३८, रा. शिवशंभोनगर, जळोची, ता. बारामती) हे तांबेनगर येथील सम्राट वाईन शॉपीबाहेर बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस शेळकेवस्ती, तांदुळवाडी परिसरात नेऊन मारहाण करत मोबाईल, रोख २० हजार रुपये आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींची नावे निष्पन्न केली असता गुड्ड्या बगाडे (रा. माळेगाव, ता. बारामती), गणेश गोपीनाथ खरात (अटक) (वय १९, रा. सुहासनगर, आमराई, बारामती) आणि विधीसंघर्षित बालक (वय १७, रा. सुहासनगर, आमराई, बारामती) अशी नावे समोर आली. त्यापैकी आरोपी गणेश खरात याला अटक करण्यात आली असून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपीस 03 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

        ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्था.गु.शा. निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव 

सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार भारत खारतोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील श्रेणी पोसई बी.डी. कारंडे आणि पो.हवा. स्वप्नील अहिवळे यांनी केली. 

पुढील तपास पोसई अमोल कदम करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा