अकलूज ---प्रतिनिधी
केदार लोहोकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरंदावडे येथे आकाशकंदील निर्मिती व पणती पेंटींग कार्यशाळा घेण्यात आली होत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमजान शेख सर होते.
शाळेतील पदवीधर शिक्षक डाॅ.प्रेमनाथ रामदासी यांनी प्रात्यक्षिकांसह आकाश कंदीलाचे विविध प्रकार स्पष्ट केले.शाळेतील उपशिक्षिका स्वाती गायकवाड मॅडम,श्रद्धा कुलकर्णी मॅडम व शिक्षणसेवक शुभम म्हसवडे सर यांनी विद्यार्थ्यांकडून गटकार्य करुन घेतले.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत अनेक सुंदर आकाश कंदील तयार केले. काही विद्यार्थ्यांनी सुरेख असे पणती पेंटींग केले.कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकाश कंदील व पणत्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले.शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा