उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील फिनिक्स इंग्लिश स्कूल २५/४ लवंग मध्ये माजी राष्ट्रपती व भारताचे ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कर्तव्य मेडिकल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ .फैज सैय्यद यांनी विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कलाम यांच्या प्रतिमेस डॉ.फैज ,रणजित चव्हान, नूरजहाँ शेख यांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटत राहा’ या कलाम यांच्या विचारांवर मुख्यद्यापिका नूरजहाँ शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ.फैज यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले आणि कलाम यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता आणि प्रेरणा निर्माण झाली.
या प्रसंगी शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख ,रणजित चव्हान ,केशव शेंडगे ,गुलशन शेख ,तमन्ना शेख आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा