Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

ताहेरा फाउंडेशन च्या वतीने परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लॅपटॉपची मदत* *विजय दादांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांला सुपुर्द


 

अकलूज--- प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी

गरीब होतकरू मुले अर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अकलूज येथील ताहेरा फाऊंडेशन सदैव मदतीचा हात पुढे करत असते.त्यामुळे अकलूज परिसरातील मुले शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेताना दिसत आहेत.त्यामध्ये काही जण वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत तर काही अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.

          महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शिवरत्न बंगला येथे अब्दाल शेखला ताहेरा फाउंडेशनच्या वतीने लॅपटॉप देवून अब्दालच्या शिक्षणाची अडचण दूर करण्यात आली.यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी ताहेरा फाउंडेशनच्या कार्याचे अभिनंदन केले.अब्दालला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिला.



        यावेळी मुस्लीम समाजातील जेष्ठ कमालभाई शेख,मुक्तार कोरबू, हाजी मौलाभाई मुलाणी,शब्बीर शेख,भैया माढेकर,दादा तांबोळी, जावेद तांबोळी,रफिक तांबोळी उपस्थित राहून ताहेरा फाउंडेशनच्या शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांला केलेल्या मदतीसाठी सर्वांनी कौतुक केले.ताहेरा फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच्या उपक्रमाचा अहवालाची क्षणचित्रे-फोटो पाहून विजयसिंह मोहिते पाटील यांनी ताहेरा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना शाबासकीची थाप दिली व पुढेही लोकउपयोगी उपक्रम राबवण्याचे मार्गदर्शन केले.यावेळी ताहेरा फाउंडेशनचे खजिनदार हाजी अस्लमभाई तांबोळी,जाकिरभाई तांबोळी,मुसाभाई तांबोळी हे मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते.


*चौकट*

मी अब्दाल शेख लुमेवाडी (ता.इंदापूर) येथे राहतो.गेल्या वर्षी यशवंतनगर-अकलूजच्या इंजिनिअरिंग काॅलेजचा डिप्लोमा टाॅपर आहे.मला पुढचे शिक्षण घेवून खूप मोठे होऊन स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची इच्छा आहे.परंतु सध्या माझ्या घरची परिस्थिती थोडी बिकट आहे.त्यामुळे मला शिक्षण घेताना अडचणी येवू लागल्या होत्या.मला ताहेरा फाउंडेशनच्या मदतीची गरज होती.ताहेरा फाउंडेशने योग्य वेळी मदत केल्यामुळे माझे शिक्षण सरळ व सुरळी होणार आहे.त्यासाठी ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी माझी चौकशी केली.सर्व कागदपत्रे तपासून ताहेरा फाउंडेशनच्या आपल्या सर्व जबाबदार सहकाऱ्यांना अब्दालची कहानी कथन केली.त्यामुळे आता माझ्या शिक्षणाचे सर्व मार्ग सोपस्कार झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा