Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

इंदापूर तालूका भारतीय जनता पार्टी आयुष्यमान भारतच्या अध्यक्षपदी नागेश गायकवाड यांची निवड


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- इंदापूर तालूका भारतीय जनता पार्टी आयुष्यमान भारतच्या अध्यक्षपदी नागेश गायकवाड यांना निवडीचे पत्र पुणे जिल्हा दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा परिषद माजी बाधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रविण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, इंदापूर तालूकाध्यक्ष राम आसबे याच्या उपस्थितीत देण्यात आले.

     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार ॲड. राहुल कुल यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टी आयुष्यमान भारतच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

    निवडी प्रसंगी नागेश गायकवाड म्हणाले, भाजप पक्ष घराघरात पोहचविण्याचे काम यापुढे करणार आहे. तर पक्षाच्या व सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहिलो आहे व यापुढेही राहणार आहे. तसेच आरोग्य समस्या सोडवण्यासाठी २४ तास जनतेच्या संपर्कात राहून अधिकचा फायदा मिळवून देण्यास कटिबद्ध आहे.

फोटो - इंदापूर येथे इंदापूर तालूका भारतीय जनता पार्टी आयुष्यमान भारतच्या अध्यक्षपदी नागेश गायकवाड यांना निवडीचे पत्र देताना.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा