संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाजार समितीला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या वतीने वसंत दादा पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यंदाचा हा पुरस्कार माळशिरस तालुका अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती ला प्राप्त झाल्याबद्दल सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांना अकलूज येथील मुख्तार फ्रुट स्टॉल कंपनी व विजयवाडी ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
महाराष्ट्रात ३०५ बाजार समिती मधून बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वात जास्त म्हणजे २२ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्रातील एकमेव सभापती मदनसिंह मोहिते पाटील असुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
महाराष्ट्रातील बाजार समित्यांच्या सन २०२३/२४ या आर्थिक वर्षाची क्रमवारी मध्ये महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला आहे
वसंत दादा पाटील स्मृती पुरस्कार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती प्राप्त झाल्याने विजय वाडी ग्रामपंचायत व मुख्तार फ्रुट कंपनी यांच्या वतीने सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला
याप्रसंगी सरपंच उमेश भंडारे मा. उपसरपंच आप्पासो इंगळे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन बाळासो इंगळे, विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विजयनगर संचालक -हनुमंत पवार प्रगतशील बागायतदार मधुकर चव्हाण, मुख्तार फ्रुट कंपनीचे मालक --प्रसिद्ध व्यापारी आणि महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीचे माळशिरस तालुका अध्यक्ष मुख्तार बागवान, शिवाजी बंडगर उमेश रिसवडकर, मुबारक नदाफ ,उमेश इंगळे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा