संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या गावात शिवसेनेची शाखा उद्घाटन — काँग्रेसला मोठा धक्का
तुळजापूर : धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या स्वतःच्या गावात आज शिवसेना पक्षाची शाखा सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
तुळजापूर तालुक्यात अलीकडच्या काळात शिवसेना पक्षाच्या शाखा उद्घाटनाची लाट सुरू असून एकापाठोपाठ एक गावात शाखा स्थापन होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीत वाढ होताना दिसत आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील अन्य पक्षांना यातून धक्का बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मधुकरराव चव्हाण यांच्या गावात झालेल्या या शाखा उद्घाटन सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमास तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शेतकरी सेना तालुकाप्रमुख गणेश नेते, शहर संघटक नितीन मस्के, उपशहर प्रमुख रमेश चिवचुवे, महिला आघाडीच्या मीनाताई सोमाजी, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, भुजंग मुकेरकर, गणेश पाटील, विकास जाधव तसेच अणदूर गावचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, सचिव, कोषाध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, तसेच धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख अमोल जाधव होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“शिवसेना पक्ष हा लोकांशी थेट जोडलेला पक्ष आहे. तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा आमचा संकल्प आहे, आणि हा प्रवास थांबणार नाही.”
या शाखा उद्घाटनामुळे परिसरात मोठी राजकीय चर्चा रंगली असून, पारंपरिक काँग्रेस गड असलेल्या गावात आता शिवसेनेचा झेंडा फडकू लागल्याने आगामी स्थानिक निवडणुकांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे.
याप्रसंगी तुळजापूर तालुका शिवसेनाप्रमुख अमोल जाधव, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, शेतकरी सेना तालुका प्रमुख गणेश नेपते, शहर संघटक प्रशांत उर्फ नितीन मस्के, उप शहर उपप्रमुख -रमेश काका चिवचिवे, महिला आघाडीच्या मीनाताई, राधा घोगरे, सुवर्णा उमाप, सोमाजी शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे भुजंग मुकेरकर, गणेश पाटील विकास जाधव , गणेश नरे चंद्रकांत (बाळू) घुगे- शाखाप्रमुख, सागर मोकाशे, उपशाखाप्रमुख,-संगमेश्वर कुताडे, सचिव, विलास साळुंखे कोषाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा