सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
बारामती येथील कै. नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून चौफेर लोकोपयोगी सामाजिक कार्य होत असून प्रतिष्ठानचे कार्य आदर्श व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पुणे पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी केले.
बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे कै. नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त प्रतिष्ठान तर्फे बारामती व पंचक्रोशीतील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे व्यवस्थापक दीपक वाबळे, बारामती जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांच्यासह सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. गणेश इंगळे पुढे म्हणाले, बारामती विभाग हा समाजभान असलेला विभाग असून येथे काम करताना पत्रकारांचे नेहमी सहकार्य लाभले. जे बारामती येथे काम करतात, ते संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही काम करू शकतात हा माझा अनुभव आहे. नालंदे प्रतिष्ठानचा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
यावेळी बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले,
डिजीटल काळातील पत्रकारिते मधील अद्ययावत बदल स्वीकारून पत्रकारांनी सतर्क राहिले पाहिजे. बऱ्याच घटना या पत्रकारांच्या सतर्कतेमुळे उघड होतात. खरी पत्रकारिता करून हा लोकशाहीचा स्तंभ मजबूत करण्याचे काम पत्रकार बांधव करत आहेत. मात्र पत्रकारांना देखील दुसरा शाश्वत व्यवसाय असणे ही काळाची गरज आहे. यावेळी प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे संयोजक योगेश नालंदे यांनी प्रतिष्ठानच्या विविध कार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी बारामती मधील पत्रकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जाणारा "कै. नामदेवराव नालंदे जीवनगौरव पुरस्कार", मरणोत्तर कै द.रा. पवार यांना तसेच पळशी येथील पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना देण्यात आला.
यावेळी सकल पत्रकारांच्या वतीने बोलताना ज्येष्ठ पत्रकार वसंतराव मोरे यांनी स्वर्गीय पत्रकार नामदेवराव नालंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, वसंतराव मोरे, जयंत निलाखे, उमेश दुबे यांच्यासह सुमारे ४० हून जास्त पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
स्वागत निमंत्रक डॉ. प्रशांत नालंदे यांनी तर सूत्रसंचालन नानासाहेब साळवे यांनी केले. आभारप्रदर्शन ॲड. मेघराज नालंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण हिवरे, प्रदीप ढुके व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. चंदूकाका सराफ यांच्या वतीने कार्यक्रमा साठी ट्रॉफी सौजन्य देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा