Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

इंदापूर नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी "भरत शहा" यांचा अर्ज दाखल

 सहसंपादक --संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

 मो:--9922 419159




इंदापूर नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भरत सुरेशदास शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे यांच्याकडे भरत शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज दिला.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे,  मावळत्या नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकूंद शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, अंगद शहा, सौ. वैशाली भरत शहा, सौ. सायली संजय शहा,  बापू जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी विरोधी पक्षनेते गजानन गवळी, गट नेते पोपट शिंदे, माजी नगरसेवक गणेश महाजन व स्वप्नील राऊत, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, प्रशांत उंबरे, मनोज राजगुरू, जयवंत बानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भरत शहा म्हणाले, एकच ध्यास, इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहे.  या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व पक्षश्रेष्ठी यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा