Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

अकलूज नगराध्यक्ष पदासाठी १ तर सदस्य पदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448




अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार थेट नगराध्यक्ष पदासाठी १ उमेदवार तर सदस्य पदासाठी ७,असे एकूण ८ अर्ज आज अखेर प्राप्त झाले आहेत. पैकी ७ उमेदवारी अर्ज हे महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून तर १ अर्ज काँग्रेस पक्षाकडून प्राप्त झाला आहे. अध्यक्षपदासाठी सुवर्णा अनिल साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर सदस्य पदासाठी महाराष्ट्र विकास सेनेकडून प्रभाग ६ मधून किसन माने, प्रभाग १३ मधून दत्तात्रय कांबळे, प्रभाग 11 आशुतोष साठे, प्रभाग ९ ज्योती सकट,प्रभाग ७ अनिल साठे, प्रभाग ९ आशुतोष साठे, काँग्रेस पक्षाकडून गिरीश शेटे यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा