Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

स्वतःबरोबर अनैतिक संबंध असलेल्या महिलेचा साडीने गळा दाबून खून करणाऱ्या आरोपीस माळशिरस न्यायालयाने सुनावली अजन्म कारावासाची शिक्षा

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



स्वतः बरोबर अनैतिक संबंध असलेल्या महिलेचा साडीने गळा दाबून खून करणाऱ्या शंकर दिगंबर सरवदे या आरोपीस एल डी हुल्ली जिल्हा व सत्र न्यायाधीश माळशिरस यांनी साक्षीदारांच्या तपासावरून दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली 

   याबाबत सविस्तर वृत्त असे की

फिर्यादी मोहन बनसोडे रा. वाफेगांव ता. माळशिरस यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी शंकर दिगंबर सरवदे रा. वाफेगांव ता. माळशिरस यांचेविरुध्द अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. ५४४/२०२२ भा.द.वि.सं.क. ३०२, २०१, ३७६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या केसमध्ये फिर्यादी यांच्या पत्नीचे आरोपी बरोबर अनैतिक संबंध होते. त्यावेळी फिर्यादी व इतर साक्षीदार यांनी आरोपी व पिडीतेला (मयत) यांना समजावून सांगितले नंतर पिडीतेने आरोपीचे अनैतिक संबंध सोडून दिले होते. काही दिवसानंतर आरोपीने पिडीतेला जोगळेकर यांचे शेतात घेऊन गेला व तीचे सोबत संबंध ठेवून तिचा साडीने गळा आवळून खुन केला.

सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक वैभव मारकड व सुनिल जाधव यांनी करुन आरोपीविरुध्द मे. न्यायालयात चार्जशिट दाखल केले होते. मे. कोर्टात सदर केस चालू असताना फिर्यादी, साक्षीदार, तपासीक अधिकारी व डॉक्टर यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या व सरकारी पक्षाने एकुण १५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यावरुन या प्रकरणात मा. श्री. एल. डी. हुली सो, जिल्हा व सत्र न्यायाधीश, माळशिरस यांनी आरोपी शंकर सरवदे यास भा.द.वि.

सं.क. ३०२ नुसार दोशी धरुन आजन्म कारावास व २००० रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास व भा.द.वि.सं.क. २०१ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा दिली आहे.

सदर केसमध्ये संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग, अकलुज, निरज उबाळे, पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. सदर केसमध्ये सरकारी वकील संग्राम एस. पाटील यांनी तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोसई विजय जाधव, पोलीस हवालदार मुबारक तांबोळी, हरीष भोसले यांनी काम पाहिले

 


(निरज उबाळे)

पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे

-----------------------------------------------------------------


-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा