अकलूज-- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ चा ६४ व्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या १ लाख ५१ हजार १५१ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगतीपथावर वाटचाल चालू आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ हा अखंडितपणे पुर्ण क्षमतेने सुरू असून आज अखेर १ लाख ८५ हजार ०६४ मे.टन ऊसाचे गाळप होऊन १ लाख ५१ हजार १५१ क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. सध्या प्रतिदिन सरासरी ८५०० मे.टन प्रमाणे ऊसाचे गाळप चालू आहे.या सिझनमध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाला असून दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी अखेर १ कोटी ४७ लाख ४५ हजार ९६० युनिट वीज निर्माण झाली असून त्यामधून ८९ लाख ९४ हजार २०० युनिट वीज विक्री केलेली आहे.तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टिलरी मध्ये दि.२० नोव्हेंबर २०२५ अखेर २२ लाख ८५ हजार ७४८ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट तसेच १९ लाख ३० हजार ६ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असल्याची माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अनिल काटे यांनी दिली.
या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने- देशमुख तसेच संचालक लक्ष्मण शिंदे,सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे,ॲड.विजयकुमार पवार, रावसाहेब मगर,संग्रामसिंह जहागिरदार,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर,रावसाहेब पराडे,महादेव क्षिरसागर,भिमराव काळे,गोविंद पवार,डॉ.सुभाष कटके,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक ॲड.प्रकाशराव पाटील,रामचंद्रराव सावंत-पाटील संचालिका सौ.सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे माजी संचालक भिमराव काळे,महादेवराव घाडगे,रामचंद्र चव्हाण,सुनिल एकतपुरे,महादेवराव चव्हाण,चांगदेव घोगरे,राजेंद्र मोहिते, महाळूंग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे,शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडिया लेजर शो कमिटी संचालक बाळासाहेब माने-देशमुख,दत्तात्रय चव्हाण,राजेंद्र भोसले,धनंजय सावंत,नामदेव चव्हाण,धनंजय दुपडे,अनिलराव कोकाटे,श्रीकांत बोडके,सौ.हर्षाली निंबाळकर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सदर साखर पोती पूजन प्रसंगी कारखान्याच्या संचालिका, कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत चिफ केमिस्ट एस.एन.जाधव व सत्कार चिफ इंजिनियर एस.के.गोडसे यांनी केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा