Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे श्री गुरुदत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण वाचनाचे पाचव्या वर्षीही यशस्वी आयोजन, श्रीगुरु सोहम महाराज यांच्या हस्ते व्यासपीठ व गाथेचे पुजन

 कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 

8378081147




 पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे श्री गुरुदत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण वाचनाचे पाचव्या वर्षीही यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरू दत्त जयंती निमित्त राम महाराज अभंग तर काल्याचे किर्तन श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहुकर (मळोली) यांचे काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

    अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम महाराज गाथा पूजन, झेंडा पूजन, विना, टाळ, मृदुंग, पूजन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य सोहम महाराज देहुकर यांच्या हस्ते व पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.

     दररोजच्या दिनक्रमात रोज सकाळी काकडा आरती, दुपारी गाथा भजन, सायंकाळी ४ ते ६ वाजता हारीपाट व संध्याकाळी नित्यनियमाने ७ ते ९ कीर्तन सेवा व रात्रभर परीसरातील भजनी मंडळींच्या वतीने हरिजागर कार्यक्रम होत आहे.

     किर्तनसेवा श्री पोपट महाराज पाटील (यावलकर),श्री राम महाराज शेळके (गारअकोले), श्री ज्ञानेश्वर महाराज शेरकर (सुरवड), श्री नामदेव महाराज लबडे (पंढरपूर), श्री ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगावकर), श्री ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी),श्री दत्त जयंती निमित्त राम महाराज अभंग तर काल्याचे किर्तन श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहुकर (मळोली) यांचे होणार आहे.

      पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त व ग्रामस्थांच्या वतीने दररोजचा चहा, अल्पोहार, महाभोजन, फुले प्रत्येक दिवसाला रोज नित्यनेमाने व्यवस्था व सर्व सुविधा पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त, व ग्रामस्थांच्या वतीने दररोजची सोय करण्यात आली. त्यामध्ये चहा शंकर बोडके, अल्पोहार शरद बोडके, महाभोजन, फुल हारांची व्यवस्था नबिलाल शेख, रांगोळी दत्तात्रय सुतार, श्रीफळ तसेच जारचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तेजस ॲक्वा, मंडप स्टेज व डेकोरेशन टिंकू ढवळसकर आणि स्वयंपाकी आचारी शिंदे बुआ अशी व्यवस्था करण्यात आली आहे.


    दररोजचे अन्नदाते बबन शंकर बोडके, गोरख शंकर बोडके, व्यंकट शंकर बोडके, समस्त सुतार परिवार, कै. महादेव दगडू बोडके व कै.चि. शंभु जिजाबा बोडके यांचे स्मरणार्थ दतु बोडके, सुर्यभान बोडके, अशोक बोडके, रेवण बोडके, महादेव भानुदास किरकत, कै. रघुनाथ नारायण बोडके यांच्या स्मरणार्थ नामदेव नारायण बोडके, सुदर्शन रघुनाथ बोडके, कै. लोकनेते महादेवराव बोडके (दादा) यांच्या स्मरणार्थ श्रीकांत शिवाजी बोडके, पोपट शिवाजी बोडके, केशव शिवाजी बोडके, कै.चि. आदित्य व आदिती मोहन देवशेटे यांचे स्मरणार्थ महादेव ज्ञानदेव देवशेटे, श्रीगुरू दत्त जयंती निमित्त महाप्रसाद सुनिल शाहुराव बोडके, तुकाराम पांडुरंग बोडके, आबासाहेब तुळशिराम बोडके तर शेवटच्या दिवशी कै. श्री. मच्छिंद्र नामदेव बोडके यांचे स्मरणार्थ ज्ञानेश्वर मच्छिंद्र बोडके, निलेश तात्या बोडके यांचे वतीने आहे. 

फोटो - पिंपरी बुद्रुक येथे श्री दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे गाथा पुजन करताना श्रीगुरू सोहम महाराज देहुकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा