Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

एक रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर निवडणुकीतून माघार घेईन--नगराध्यक्ष पदाचे उमेदवार "भरत शहा" यांचे विरोधकांना खुले आव्हान

 सहसंपादक --डॉ. संदेश शहा 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9922419 159


आम्ही माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते आहोत. त्यामुळे नगरपरिषदेतील


माझ्या कार्यकाळात "एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यास मी तात्काळ  निवडणुकीतून माघार घेईन, माहितीचा अधिकार वापरून माझ्या कालावधीतील सर्व कामांची पडताळणी करा, असे खुले आव्हान  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी विरोधकांना दिले



छत्रपती संभाजी चौक, शहीद भगतसिंग चौक, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सभेत ते बोलत होते. या सभेस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ व दिलीप वाघमारे, तालुकाध्यक्ष हनुमंत  कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील व श्रीमंत ढोले, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या सीमा कल्याणकर,आरपीआय आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे, बारामती लोकसभा प्रमुख बाळासाहेब सरवदे, गणेश महाजन, शकीलभाई सय्यद, प्रा. अशोक मखरे, प्रमोद राऊत, बंडा चव्हाण, सुनील तळेकर, मनोज राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते.

भरत शहा पुढे म्हणाले, आम्ही कपडे, घनकचरा व्यवस्थापन तसेच इंदापूर नगरपरिषदेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधक करतात. आम्ही व्यापारी पद्धतीने नगरपरिषद चालवली असा आरोप करतात. नगरपरिषदेची चतुर्थ घरपट्टी, शास्ती आणि दंड व्याज वाढल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दर्गा मज्जिद चौकातील सभेत मतदारांची दिलगिरी व्यक्त करून जाहीर माफी मागितली होती. मागील निवडणुकीमध्ये चुकीचा उमेदवार दिला असल्याची कबुली यावेळी हर्षवर्धन पाटलांनी दिली. आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत १९ वर्ष काम केले. त्यांच्याकडे नगररचना विभागाचे प्रभारी मंत्रीपद देखील होते. मग त्यांना नगरपरिषदेचे कामकाज माहिती नाही का ? आम्ही चुकीची शास्ती लावली असे आरोप हर्षवर्धन पाटील करत आहेत मग आम्ही निवडलेला नेताच चुकीचा होता की काय असा पलटवार भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर करून तोफ डागली. मागील पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही भ्रष्टाचार केला असल्याचे आरोप विरोधक सातत्याने करत आहेत, आमच्या कार्यकाळातील प्रत्येक योजनेची माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवावी जर आम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल असे आढळल्यास या निवडणुकीतून तक्षणी  माघार घेऊ अशी ग्वाही शहा यांनी दिली.


नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शास्ती संदर्भात चुकीची माहिती देवू नये, शास्ती ही बेकायदेशीर झालेल्या बांधकामावर किंवा घरपट्टी न भरलेल्या मालमत्ता धारकांना बसते. राज्यसरकारने इंदापूर शहरातील शास्ती बसलेल्या मालमत्ता धारकांची व घरपट्टी लागलेल्या व्याजात सवलत द्यावी या आशयाचे पत्र आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचलनालय, नवी मुंबई यांना दिनांक ९ ऑक्टोबर २५ रोजी  देण्यात आले आहे. अभय योजनेमध्ये इंदापूर शहरातील मालमत्ता धारकांना शास्ती पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला आहे असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. व्यापारी संघाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक पत्र दिल्यानंतर त्यावर तातडीने ३८२ कोटी रुपयांचा निधी पडून इंदापूर व करमाळा तालुक्यास जोडणाऱ्या शिरसवडी ते कुगाव या भीमा नदीवरील पुलाचे काम युद्धपातळीवरून सुरू झाले. त्यामुळे इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याची धमक फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे असल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आमची श्रीमंती पिढीजात असून आम्ही सचोटीने पैसे कमवत आहोत. आमचा विजय निश्चित असल्याने विरोधक विकास कामांवर बोलण्याऐवजी आमच्या पैशावरून बोलत आहेत. मात्र मतदार सजग असून ते विकासाच्या बाजूनेच मतदान करतील असा आत्मविश्वास शेवटी भरत शहा यांनी व्यक्त केला. 

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोना काळात माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांनी इंदापूर करांना अन्न व औषधे कमी पडू दिली नाहीत. त्यांनी शहरवासियांची निस्वार्थी पद्धतीने सेवा केली. या शहा घराण्याने सहकार, शेती, शिक्षण, धर्म, संस्कृती, अर्थकारणात अनेक पिढ्या अनमोल योगदान दिले आहे. या शहा घराण्यातील भरत शहा हे आपले उमेदवार आहेत हे आपले भाग्य आहे, शहराच्या विकासाचे त्यांचे मोठे व्हिजन आहे. इंदापूर शहरात १०० कोटी रुपयांची ग्रीन मार्केट ची उभारणी करून शहर सुसज्ज व युवापिढीस रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय आहे. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरत शहा व २० उमेदवारांना घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारून विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

सूत्रसंचालन प्रशांत सिताप यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा