उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
लवंग येथील श्री हनुमान विद्यालयात आठवडी बाजार’ हा आगळावेगळा शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने संपूर्ण शाळेचे प्रांगण लहान-मोठ्या दुकानांनी गजबजून गेले , विद्यार्थ्यांनी भाजीपाला,स्नॅक्स,चहा, शालेय साहित्य, अशा विविध विभागांची आकर्षक मांडणी केली.उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व व्यवहार विद्यार्थ्यांनीच हाताळले. मोजमाप, पैशांची देवाणघेवाण, ग्राहकांशी संवाद, वस्तूंची मांडणी, जाहिरात यातून मुलांना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहारकौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली.शेख पवार ,म्हस्वडे मॅडम नलवडे ,कोळी सर या शिक्षकांनी त्यांना केवळ मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिर्के सर
यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, जबाबदारी आणि उद्योजकता विकसित होते. अभ्यासासोबतच प्रत्यक्ष अनुभव ही मुलांची खरी शाळा आहे.”
पालक व ग्रामस्थांनी उपक्रमाला भेट देत मुलांची कला, कल्पकता आणि व्यवस्थापन कौशल्याची प्रशंसा केली.या आठवडी बाजारामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा