*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श व गुणवंत लिपीक पुरस्कार नंदकुमार बापूराव पाटील यांना माजी आमदार उल्हास पवार, अधिष्ठाता विजय खरे यांचे हस्ते देण्यात आला.
पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनेच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श व गुणवंत लिपीक पुरस्कार चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद दंडवते कनिष्ठ महाविद्यालय नरसिंहपूर येथे कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक नंदकुमार बापूराव पाटील यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार उल्हास पवार यांचे शुभहस्ते व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिष्ठाता विजय खरे यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ अध्यक्ष अनिल माने, शिवाजी खांडेकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रसेवा दल निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक, पुणे येथे शाल श्रीफळ व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे, कार्याध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, माजी अध्यक्ष संजय धुमाळ, सौ. सुरेखा पाटील, सोहम पाटील, माऊली पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सभासद यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
फोटो - पुणे येथील राष्ट्रसेवा दल निळू फुले सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा