*सहसंपादक -डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी*
*इंदापूर,मो. 9922419159*
इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूलच्या तीन दिवसीय क्रीडा दिन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत यलो हाऊसने वि
जेतीपदाची ट्रॉफी पटकावली. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा खिलाडू वृत्ती, आत्मविश्वास, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, संघभावना, नेतृत्वगुण विकसित व्हावे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धा शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त अंगद शहा व सौ. रुचिरा शहा यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी क्रीडा दिनाचे उद्घाटन शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा तथा विश्वस्त सौ. अंकिता मुकुंद शहा, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, विश्वस्त सौ.
वैशाली भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुकुंद शहा म्हणाले, आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. खेळामध्ये देखील विद्यार्थ्यांना यशस्वी करिअर करता येत असल्याने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
यावेळी हाउसवाइज विद्यार्थ्यांच्या रॅलीमुळे मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
तर के–२ विद्यार्थ्यांच्या ड्रिल प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी प्री प्रायमरी व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. धावणे, लिंबू चमचा, तीन पायांची शर्यत, हिप हॉप, बेडूक उडी, रिले इत्यादी वैयक्तिक व सांघिक खेळांचे आयोजन संपन्न झाले. दुसऱ्या दिवशी प्री प्रायमरी व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ स्पर्धा संपन्न झाली. या विविध खेळांमुळे विद्यार्थ्यांचे हालचाली कौशल्य, समन्वय, संघभावना व आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. तिसऱ्या दिवशी पालकांसाठी देखील विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले.
तिसऱ्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बक्षीस वितरण कुराश खेळाचे पंच तेजश्री व्यवहारे व जयश्री व्यवहारे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विजेते तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. खेळत रंगत येण्यासाठी जादूगार नितीन झेंडे यांनी आपल्या जादुई खेळांनी विद्यार्थी, पालक व उपस्थितांचे मनोरंजन केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा