*करमाळा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालूक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या वर विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला व यानंतर सोशल मीडिया वर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावर प्रथमच आमदार पाटील गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. यावेळी आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे व त्यांचा गट हक्कभंग प्रस्ताव प्रकरणास राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक हक्कभंग प्रस्ताव हा पुर्णतः सरकारकडुन होणाऱ्या चौकशीचा एक भाग आहे. मुळात माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आजवर केवळ अधिकारी व ठेकेदार यांचीच प्राधान्याने बाजु घेतली. आमदार पदावर असताना सुध्दा ज्या वेळेस महिन्यातुन एकदा तत्कालीन आमदार संजयमामा हे मतदार संघात येत त्यावेळी त्याच्या भोवती ठेकेदारांचाच गराडा असायचा. सर्वसामान्य माणसाला आमदार महोदयांची भेट घेणे मुश्किल होत होते. त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत संजयमामा शिंदे यांनी एकही आमसभा घेतली नाही. सतत अधिकाऱ्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचारास खतपाणी घातले. यामुळे त्यांना करमाळा व माढा तालुक्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत पंधरा हजार मतांच्या फरकाने पराभुत केले व घरी बसवले. पण तरीही अजुन सवयीनूसार अधिकारी व ठेकेदार यांचीच बाजू ते घेत आहेत. यामुळे माजी आमदार संजयमामा यांनी त्यांचे हित कशात आहे हे पाहून अधिकारी व ठेकेदार यांचीच बाजु घेत रहावी. याउलट विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे जनतेची बाजू घेत राहतील. आजवरच्या तीसहून अधिक वर्षाच्या राजकिय जीवनात आमदार नारायण आबा पाटील यांनी सतत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले व जनतेची शेतकऱ्यांची बाजु घेतली. उजनीकाठचा वीज पुरवठा खंडीत केल्यावर आमदार पदावर असताना सुध्दा त्यांनी जनतेच्या बाजूने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. पुढे आपल्या आमदार पदाचा वापर करुन शेतकऱ्यांना सहा तास वीज मिळवूनही दिली. हा इतिहास आहे. ज्यावेळी नोंदणी नसलेले डिपी काढुन घेऊन जाण्यासाठी महावितरण कडुन पथक आले होते त्यावेळी सुद्धा आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांची बाजू आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली. आपल्या आमदार पदाच्या दोन्ही टर्म मध्ये त्यांनी आमसभा घेण्याचे काम केले व जनतेला तक्रार मांडण्यासाठी खुले व्यासपीठ मिळवून दिले. तर सन २०१४ च्या आमसभेत कुकडीचे आवर्तन मिळवून देताना चांगले कर्तव्य निभावले म्हणुन शाखा अभियंता जगताप साहेब यांचे आमसभेत अभिनंदन केले. चांगले काम करणाऱ्या शिंदे, राजगुरु, कांबळे, पाटील या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करत असताना चोख कामगिरी बजावली म्हणुन नागरि सत्कारही केला. तर जिंती-कोर्टी, कुंभेज-डिकसळ व तालूक्यातील रस्त्याची कामे करत असताना चांगली भुमिका निभावली म्हणुन कार्यकारी अभियंता अमित निमकर यांचा नागरी सत्कार केला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी अतिवृष्टी काळात जमिनस्तरावर जाऊन काम केले याचे कौतुक पाटील गटासही आहे. पण अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना महसुल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी चुकीची कामे केली याबाबतही आमदार कार्यालयात तक्रारी येत आहेत हे नाकारून चालणार नाही. चांगल्या अधिकाऱ्यांना नेहमीच आमदार नारायण आबा पाटील हे सन्मानाची वागणूक देत आले आहेत. यामुळे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आता ठेकेदार व अधिकारी यांची बाजू घ्यावी आणि केवळ अधिकारी ठेकेदार यांचीच मते घ्यावीत असा मार्मिक टोला तळेकर यांनी लगावला. तर पदावर असताना आमदार नारायण आबा पाटील हे जनतेच्या मागे ठामपणे राहतील व याची परतफेड म्हणुन जनताही निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या बाजुनेच उभी असेल असेही तळेकर यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा