Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

*करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी जिंकला आहे. विश्वासघाताचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकविण्यासाठी सज्ज!!-ॲड.अजित विघ्ने( प्रवक्ते. राष्ट्रवादी काँग्रेस)*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


करमाळा तालुक्यात राजकारणाचे अड्डे(गट) मांडणाऱ्या सत्ताधुंद पुढाऱ्यांनी निवडणुकी पुरती आश्वासनांची खैरात करायची मात्र सत्तेत आल्यावर नियोजनशुन्य कारभार करून स्वतःच्या तुंबड्या भरायच्या, आपली दुकानदारी कशी चालेल हेच पहायचे याशिवाय राजकीय वारसदारी पुढे करून होतकरू सर्वसामान्य कार्यकर्त्याला कायम झुलवत ठेवायचे त्यामुळेच करमाळा तालुका विकासापासुन कोसो दूर गेलेला पहायला मिळतो. सन २०१९ ते २०२४ या कालावधित माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी नियोजनपूर्वक करमाळ्याचा विकास आराखडा तयार करून, वीज, रस्ते, पाणी,आरोग्य, शासकीय इमारतींचे नुतनीकरण, पुनर्वसन,तिर्थक्षेत्र विकास, सिंचन योजनांकरिता भरीव निधी,जलजीवन मिशनची कामे, दलित वस्ती, तांडा वस्ती योजना निधी, सर्वसामान्यांना घरकुले, अपंग निधी, लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, गोरगरिबांना विविध आजारांकरीता आर्थिक मदत, शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचे माध्यमातुन तालुक्यासाठी मिळवलेला विशेष निधी,वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे  जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन दिलेले लाभ यासह अनेक प्रभावी योजना राबवुन ३५०० कोटींचा विकास निधी करमाळा तालुक्यासाठी मंजुर केला. वास्तविक सुरुवातीचे दोन वर्ष कोव्हीड असतानाही उर्वरीत तीन वर्षाच्या काळात मामांनी नियोजन आखुन केलेले काम उल्लेखनीय आहे.          

                                                    आज ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र तरी देखिल विरोधक मंडळींनी स्वतःची दुकानदारी मोडीत निघेल या भितीने माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेविरुद्ध एकत्र येत बेफीकीरपणे खोटी आश्वासने देऊन विधानसभा आणि आदिनाथ कारखान्याची निवडणूक जिंकली परंतु निवडणुकी पुरती दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पराभवाचे शल्य मनात न ठेवता सर्वसामान्य जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी  असलेली आपली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील युवक वर्गासह ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी देखिल आता मामाच्या डायरेक्ट संपर्कात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळते. करमाळा तालुक्यातला कोणीही सर्वसामान्य माणुस कधीही मामाला जाऊन हातात हात घालुन हितगुज करताना दिसत आहे.करमाळा तालुक्याचे राजकारणात एण्ट्री करणाऱ्या संजयमामा शिंदे यांची मतांची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीत वाढतच राहीली आहे. हे वारंवार सिद्ध झालेले आहे. अतिशय शांत, संयमी आणि नियोजनबद्ध असणाऱ्या संजयमामांची क्रेझ आता दिवसेंदिवस वाढत असुन करमाळा तालुक्यातील  जनसामान्य जनतेचा विश्वास माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी जिंकलेला असल्याचे दिसुन येते. खोटी आश्वासने देऊन विश्वासघाताचे राजकारण करणाऱ्यांना जनता जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुकीतुन हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड.अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा