Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

*नरसिंह चिवटे यांनाआदर्श पालक पुरस्कार प्रदान---* *बालगंधर्व पुणे येथे झाला भव्य सत्कार सोहळा संपन्न*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


करमाळा येथील जेष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे 

 यांचा पत्नी सौ मंदाकिनी नरसिंह चिवटे यांचा बालगंधर्व येथे राजपिता राजपिता शहाजीराजे आदर्श पालक पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे उपस्थित होते 

 या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार राजन खान यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले 

 या सत्कारात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मातोश्री सरिता गंगाधर फडवणीस

 यांचाही सत्कार करण्यात आल



 शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष प्रमुख 

 तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी

 करमाळा तालुक्याचे सुपुत्र मंगेश चिवटे

 यांना विशेष मार्गदर्शन करून चांगले संस्कार देऊन समाजात एक चांगला देशसेवक समाजसेवक घडवला अशीच चांगली व्यक्तिमत्व देशात तयार झाले तर देश अधिक सक्षम होईल असे यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सांगितले 

 या सत्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज साहित्य कथाकार पत्रकार उपस्थित होते 

 या कार्यक्रमासाठी नरसिंह चिवटे यांच्या पत्नी मंदाकिनी चिवटे

 सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे

 सौ मनीषा वासकर पंढरपूर

 सो भारती डिकोळे बार्शी 

 अजिनाथ नगरे पुणे 

 राजू करजखेडे  पुणे

 अमरनाथ चिवटे करमाळा 

 आधी जण उपस्थित होते  


 यावेळी बोलताना नरसिंह चिवटे म्हणाले की आमच्या घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असून ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठ वाचन पांडुरंगाची पांडुरंगाची भक्ती यामुळे  हे सर्व यश मिळाले याचे सर्व श्रेय पंढरपूरच्या  पांडुरंगाला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा